कोळपा येथील एमडीए फाऊंडेशनचा एमडीए महा उत्सव उत्साहात

 कोळपा येथील एमडीए फाऊंडेशनचा एमडीए महा उत्सव उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
कोळपा येथील एमडीए फाउंडेशनच्या वतीने आयोजित एमडीए महाउत्सव उत्साहात झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, मंगेश बिराजदार, पत्रकार विजयकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. संगीताताई केवळराम, प्रतिक्षाताई केवळराम, परियंताताई आंबेकर, दिनेश आंबेकर, यशवंत आंबेकर, सुरेश केवळराम, रणजित केवळराम, लक्ष्मण पाटील, ओमप्रकाश झुरळे,राहुल केवळराम यांचीही मंचावर उपस्थिती होती. या महाउत्सवात शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थित विद्यार्थी व पालकांनी या सादरीकरणाला दाद दिली. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रा. डॉ. संजय क्षिरसागर, प्रा. रवी कु-हाडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचा-यांची यावेळी उपस्थिती होती.संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर आणि पालकांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने