पीसीआरएच्या कृषी क्षेत्रातील 'इंधन संरक्षण' प्रदर्शनास प्रतिसाद

 पीसीआरएच्या कृषी क्षेत्रातील  'इंधन संरक्षण' प्रदर्शनास  प्रतिसाद

लातूर : श्री सिद्वेश्वर कृषी महोत्सवात 'पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ' यांच्या कृषी क्षेत्रातील 'इंधन संरक्षण' प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी यंत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या ट्रॅक्टर आणि प्राइम मूव्हर्समधील डिझेलचा वापर कमी करणे -इंधन बचतीसंबंधी माहिती पंप सेटसाठी चांगल्या देखभाल पद्धतीं इत्यादी  व्हिडिओद्वारे प्रदर्शनीत देण्यात येत आहे.त्यामुळे कृषी क्षेत्रात 25%इंधनाची बचत होणार आहे.आगामी इंधन-कार्यक्षम उपकरणे आणि उत्पादनांचा अवलंब करण्यास पीसीआरएच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. याचा थेट परिणाम शेतीवरील खर्च कमी होऊन प्रति हेक्टरी उत्पन्न वाढण्यावर होणार असल्याची माहिती केदार खमितकर यांनी दिली. प्रदर्शनीत 'मेरा प्रण इंधन संरक्षण' पीसीआरएच्या सेल्फी पॉईंट चे उदघाटन कृषी अधिकारी संजय नाबदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका तंत्र व्यवस्थापक अभिलाष क्षिरसागर, तालुका तंत्र व्यवस्थापक विजय गुडले आत्मा विभाग लातूर, नितीन दुरूगकर, गंगासागर सोसायटी अध्यक्ष नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. ज़िल्हा अधीक्षक व प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने