स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये श्रीराम जयंती उत्सव उत्साहात साजरा
लातूर-जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलमध्ये 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव-2023 निमित्त शालेय विद्यार्थ्यांना रामायणातील राम, सिता, लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, बाली, अंगद, जामवंत आणि प्रजा यांच्या रूपातील विविध वेशभूषा परिधान करून श्रीराम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव,समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य डॉ.सच्चिदानंद जोशी, अकॅडमी इन्चार्ज डॉ.आशा जोशी, जेएसपीएमचे एच.आर.डायरेक्टर राहुल आठवले यांच्यासह सर्वांनी श्रीरामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
रामनवमी हा असाच एक हिंदू सण आहे भगवान श्रीराम यांचा वाढदिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे श्रीरामनवमीचे महत्त्व व रामायणातील कथा त्यातील पात्रे याचे ज्ञान मुलांना अवगत व्हावे व भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आपल्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा याच उद्देशाने प्राचार्य सच्चिदानंद जोशी व उपप्राचार्य डॉ.आशा जोशी यांनी रामनवमीनिमित्त विद्यार्थ्यांना रामायणातील राम, सिता, लक्ष्मण, हुनमान, सुग्रीव, बाली, अंगद, जामवंत, प्रजा आदींची वेशभूषा करून त्याचे उत्कृष्ठ सादरीकरण उपस्थितांसमोर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती शेटकार, मीनाक्षी शितोळे, पूजा मुंडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा