अभ्यास मंडळावर नियुक्त झालेल्या माधवराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सत्कार
मुरूम, ता. उमरगा, ता. ३१ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त झालेल्या प्राध्यापकांचा नगर शिक्षण विकास मंडळ, मुरुम या संस्थेच्या वतीने रामनवमीचे औचित्य साधून गुरुवारी (ता. ३०) रोजी सत्कार करण्यात आला. या नियुक्तीमध्ये श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील पदवीधर विभाग गटातून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांची भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती झाली. तर विभाग प्रमुख नसलेले पदव्युत्तर प्राध्यापक गटातून डॉ. रविंद्र आळंगे यांची इलेक्ट्रॉनिक्स विषयात व पदव्युत्तर प्राध्यापक डॉ. महेश मोटे यांची राज्यशास्त्र विषयात आणि प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड यांची वाणिज्य विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरू यांनी नामनिर्देशन केले आहे. तसेच निवडणुकीद्वारे निवडून आलेले वाणिज्य शाखेतील प्राध्यापक डॉ. सुधीर पंचगल्ले यांची निवड तर ज्यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केली असे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनकर बिराजदार यांचा नगर शिक्षण विकास मंडळ या संस्थेमार्फत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे आदी उपस्थितीत होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार करताना बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरणजी पाटील, व्यंकटराव जाधव, डॉ. सतिश शेळके, प्राचार्य दिलीप गरुड, अशोक सपाटे
टिप्पणी पोस्ट करा