लातूर जिल्हा बँकेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार राज्य सहकारी साखर संघ निवडी बद्दल बँकेने केला सन्मान

 लातूर जिल्हा बँकेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार राज्य सहकारी साखर संघ निवडी बद्दल बँकेने केला सन्मान






लातूर-राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांची सहकारी साखर संस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या संस्थेवर तज्ञ संचालकपदी निवड झाली असून त्याबद्दल गुरूवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आदरणीय साहेब यांचा आशियाना निवासस्थानी संचालक मंडळाने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करीत असून आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेने देशपातळीवर व राज्यपातळीवर उत्कृष्ठ कार्याचे जवळपास ३६ पुरस्कार बँकेने मिळवले आहेत हे विशेष आहे 

याप्रसंगी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव , संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक एन आर पाटील, व्यंकटराव बिरादार, अशोक गोविंदपुरकर, जयेश माने, अँड राजकुमार पाटील, दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने,संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने