महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी, सहकारी कारखानदारीत प्रदीर्घ अनुभव असलेले विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातून तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,लोकप्रतिनिधी सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीपराव देशमुख साहेब यांचे अभिनंदन केले.राज्य सहकारी साखर संघ हा राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो तसेच कारखान्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कामगार, कर्मचारी यासाठी सरकार पातळीवर प्रशासन सोबत कारखान्याची बाजू मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याचे काम या राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातुन होत असते. राज्यातून तज्ज्ञ संचालकपदी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थ राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची सार्थ निवड
टिप्पणी पोस्ट करा