छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करून त्याच विचारावर शालेय विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी - अजितसिंह पाटील कव्हेकर

  छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करून त्याच  विचारावर शालेय विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी - अजितसिंह पाटील कव्हेकर


छत्रपती शिवरायांनी राष्ट्रमाता जिजाऊच्या संस्कारात स्वराज्य उभारणीचे धडे घेऊन रोहिडेश्‍वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. त्यामुळे एक दिवस शिवजयंतीचा उपक्रम करण्यापेक्षा शालेय अभ्यासक्रमातून शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याचे काम करावे आणि त्याच विचारावर आपण वाटचाल करावी असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित एमआयडीसी, कळंब रोड येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात शिवशाही प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्याते पल्‍लवीताई हाके पाटील यांच्या व्याख्यान समांभात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या कार्यक्रमाला प्राचार्य गोविंद शिंदे, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, शिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष चैतन्य फिस्के, रमेश शिंदे, अभिषेक जंगम, पूनम पांचाळ, शैलेश साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी त्याच विचारावर वाटचाल करावी असे मतही युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केले.  
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभीच प्रमुख मान्यवरांचे स्वागत शिवशाही ग्रुप महाराष्ट्रच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष चैतन्य फिस्के यांनी केले. प्रारंभी अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभार अ‍ॅड पूनम पांचाळ यांनी मांनले. या व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी विजय महाजन, ऋषिकेश क्षिरसागर, शाम गुंजोटे, अविनाश पाटील, यश घोडके, दीपक राठोड, अरविंद शेळके, शिवम किसबे, चैतन्य प्रयाग, अक्षय शिंदे, विजय पवार, पवन वाघमारे, अजय पिडगे, शाम खंडागळे, आशितोष गड्डे, निखील काळदाते, लिंबराज किवडे, आशितोष गायकवाड, श्रेयस मुंडलिक, मनोज साखरे, शेखर रामतीर्थ आदींनी परीश्रम घेतले.

महिलांना सन्मान देण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले - पल्‍लवीताई हाके पाटील
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या वाटचालीमध्ये महिलांना सन्मान देण्याचे काम केले. तेच राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करून महिलांना सरंक्षण व सन्मान देण्याचे काम प्रत्येकांनी करावे. तसेच छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा वाचून त्याच विचारावर वाटचाल करावी असे आवाहन शिवव्याख्यात्या पल्‍लवीताई हाके पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने