सनदीलेखापालास खंडणीमागीतल्या प्रकरणी गोपाळ लकडेसह दोघे गजाआड

 सनदीलेखापालास खंडणीमागीतल्या प्रकरणी गोपाळ लकडेसह दोघे गजाआड


तहसील कार्यालयातील धक्कादायक  प्रकार
लातूर:दि.
 लातूर शहरातील सनदी लेखापाल अमोल देवीदास जाधव यांना खंडणी मागितली म्हणून बोरवटी येथील गोपाळ लकडे व त्याच्या दोन भावांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार तहसील परिसरात घडला आहे.
अमोल देवीदास जाधव यांची जमीनीसंदर्भात लातूरच्या तहसील कार्यालयात तारीख होती. बुधवार,दि.8 मार्च रोजी दुपारी त्यासाठी ते तहसील कार्यालयात आले तेंव्हा गोपाळ गोविंद लकडे, दत्तात्रय गोविंद लकडे, अमोल गोविंद लकडे (तिघेही रा. बोरवटी, ता. लातूर) यांनी तू आम्हाला २ लाख रूपये दे तरच फेर लावू देऊ आणि तुला सुखाने जगू देऊ अन्यथा खतम करू , अशी उघड धमकी देत तुला लकडे काय असतात ते दाखवतो, याच्या आधी  सांगूनही तुला समजत नसेल तर माझे दोन भाऊ बाहेर थांबले आहेत  असे धमकावत पायऱ्या उतरत असताना  शिविगाळ करत अमोल जाधव यांना धक्काबुक्की केली . याप्रकरणी  वरील तिघांच्या विरोधात भादंवि ३८४, ३८५, ३२३ अन्वये शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोहेकाॅ.अंगद सिरसाट हे पुढील तपास करीत  आहेत. दरम्यान  दिवसाढवळ्या  खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर  प्रकारामुळे  नागरिकांत  भीतीचे वातावरण  आहे. तहसील कार्यालयात कामासाठी येणारे नागरिक सुरक्षीत आहेत का , असा प्रश्न  उपस्थित झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने