लातूरात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची “डायरी ऑफ विनायक पंडित” चित्रपटाने सांगता,सिने रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 लातूरात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची “डायरी ऑफ विनायक पंडित” चित्रपटाने सांगता,सिने रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटी,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लातुर येथील पीव्हीआर थिएटर मध्ये २६ मार्च पासून पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास सुरुवात झाली. ज्याचा मंगळवार दि. २८ मार्च रोजी सायंकाळी डायरी ऑफ विनायक पंडित नामक मराठी चित्रपटाने समारोप झाला. या महोत्सवाला महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मराठवाड्यात औरंगाबादेनंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळाला होता.या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आठ चित्रपट प्रसारित केले गेले यामध्ये दोन मराठी सह एकूण आठ चित्रपट दाखविण्यात आले. डायरी ऑफ विनायक पंडित या मराठी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप पार पडला.यावेळी बोलताना डायरी ऑफ विनायक पंडित मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य देशमुख म्हणाले की, मराठी चित्रपट बनविण्याचे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आणि आपण दिग्दर्शन केलेला चित्रपट लातूरच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविला जात आहे, याचा मनस्वी समाधान आहे. यावेळी बोलताना गायक मंगेश बोरगावकर म्हणाले की, मराठी चित्रपट मराठवाड्यातील मंडळी एकत्र येऊन तयार करू शकतात हे आज आपण दाखवून दिले आहे. यापुढे मराठवाड्यातील कलाकाराना मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रात कामाची संधी प्रत्येकाला मिळावी याकरिता आवश्यक ती मदत केली जाईल.यावेळी बोलताना प्रा.बी.एस वाकुरे म्हणाले की, लातूर मधील आयोजित हा चित्रपट महोत्सव हा एक लातूर वासीयाकरिता अविस्मरणीय क्षण आहे. संपूर्ण आयोजना दरम्यान विलासराव देशमुख फाउंडेशन, अभिजात फिल्म सोसायटी,पीव्हीआर, सह सर्वांचे सहकार्य लाभले .भविष्यात लहान मुलांसाठी असाच एक बाल चित्रपट महोत्सव घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना पांडुरंग कोळगे यांनी लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल च्या आयोजना मागील रूपरेखा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी याकरिता
घेतलेला पुढाकार तसेच मिळालेले सर्वांचे सहकार्य याविषयी माहिती देत सर्वांचे सहकार्य लातूरच्या चित्रपट रसिकांनी या महोत्सवाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल सर्वांचे आभार मानले.यावेळी चित्रपट दिग्दर्शक आदित्य देशमुख, श्यामजी जैन, वेदांत मुगळीकर,मंगेश बोरगावकर, ऋषिकेश जोशी, स्वप्नील देशमुख, आनंदी विकास, जितेंद्र पाटील, अनिल मुळजकर, प्रा. बालाजी वाकुरे, प्रा. बुके सर, वेदांत
मुगळीकर, राम बोरगावकर, पांडुरंग कोळगे,  यांच्यासह मान्यवर चित्रपट रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने