पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा- सहायक आयुक्त कौशल्य विकास यांचे आवाहन

 पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा- सहायक आयुक्त कौशल्य विकास यांचे आवाहन

 

लातूर,दि.29,(जिमाका):-  भारतातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 सुरु झाला असून 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएसडीसी)  यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. 9 एप्रिलपर्यंत यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. त्याचे स्क्रिनिंग 10 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान होणार असून दिनांक 15 मे 2023 पासून मुलाखतीला सुरुवात होणार आहे. त्याचा अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, लातूर यांनी केले आहे.

यामध्ये ज्यांच्याकडे तांत्रिक / व्यावसायिक उत्कृष्ट कौशल्य इत्यादीचे कुशल ज्ञान आहे अशा आयटीआय / अभियांत्रिकी वैद्यकीय / नर्सिंग/कृषी / पशुविज्ञान / फार्मसी इत्यादी पदवी / पदविकाधारक व्यावसायिक पात्रता विशिष्ट क्षेत्रात काम केले असल्यास त्याचा अनुभव असणारे याशिवाय सायन्स/ कॉमर्स / कम्प्युटर (आयटी) व इंडस्ट्रिअल लॉजिस्टिक / कॅपिटल गुड्स / सेवा इत्यादी क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या व विदेशात जाऊन आपली आर्थिक,बौध्दिक व सामाजिक भरभराट करू इच्छीणाऱ्या उमेदवारांसाठी देशपातळीवर पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजीपासून सुरु झाला असून ते 25  मे 2023 या कालावधीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

लातूर जिल्हयातील पात्रताधारक उमेदवारांना विदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. सदर जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावयाची आहे.  https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ तसेच विविध कंपन्या/उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावयाची आहे.   https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ सदर जॉब फेअरचे प्रक्रिया आणि टाईमलाईन खालीलप्रमाणे आहे.

पात्र उमेदवारांनी 9 एप्रिल पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. त्याचे स्क्रिनिंग आणि भाषा पात्रता दिनांक 10  एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान ऑनलाईन होणार  असून पात्र उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 15 मे पासून सुरु होतील.

या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यात लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी शोधक उमेदवार (Job Seeker)  व नियोक्ते (Employer) सहभागी होण्याचे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे.

अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382-299462 या दुरध्वनी क्रमांक किंवा कार्यालयाच्या ई-मेल आयडी laturrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने