आयुर्वेद महाविद्यालयात दुर्मिळ आजार व उपचारावर मार्गदर्शन
धाराशिव- शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पंचकर्म विभागाच्यावतीने विविध दुर्मिळ आजार आणि त्यावरील उपचार या विषयावर अधिष्ठाता डॉ. गंगासागरे यांनी विद्याथ्यार्र्ंना मार्गदर्शन केले.यावेळी पंचकर्म विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन टिके, सादरीकरणातील पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. मेघला कांबळे व डॉ. रुक्साना पठाण यांनी केले. यात आंतरप्रवेशित रूग्णाने अनुभव कथन केले. सादरीकरणातील सहभागी विद्यार्थ्यांचे अधिष्ठातांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास चतुर्थ वर्षातील विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा