विभागीय अंतरशालेय म्युझिकल चेअर स्पर्धेत एमडीएच्या विद्यार्थ्यांची बाजी

 


विभागीय अंतरशालेय म्युझिकल चेअर स्पर्धेत एमडीएच्या विद्यार्थ्यांची बाजी

     लातूर/प्रतिनिधी:पुणे क्रीडा युवा सेवा संचालनालय व नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतर शालेय म्युझिकल चेअर स्पर्धेत कोळपा येथील एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली.या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
   नांदेड येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.त्यात लातूर,नांदेड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध वजनगटात मुलींमधून अक्षरा मोरे,प्रतीक्षा बोडके, कल्पना कऱ्हाळे,सोनल बोडके, पुनम काठमोडे,पूजा माघडे व प्रतीक्षा बोडके तर मुलांमधून अमर पोटे,दीपक झुंजारे,गणेश भिसे,श्रेयस पाचपुते,गणेश वलाले,तुषार बर्गे,शेषराव खोकले,गणेश कोलाकट्टे या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके मिळवली.या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    क्रीडा शिक्षक शेख मुखींद अब्दुल कादर व आशा सताळकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.या यशाबद्दल संस्थेचे संचालक दिनेश मनोहरराव अंबेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रामास्वामी,प्राचार्य डॉ.संजय क्षिरसागर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने