रेणापूर नगरपंचायतीला वैशिष्टयपुर्ण योजनेतून
आ. कराड यांच्या प्रयत्नातून ५ कोटी निधी मंजूर
लातूर- रेणापूर नगरपंचायत अंतर्गत विविध १६ विकास कामासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदरील निधी मंजूर झाल्याने रेणापूर येथील पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकाऱ्यांनी आ. कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.
आ. रमेशआप्पा कराड यांनी पाठपुरावा केल्याने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रेणापूर नगरपंचायत अंतर्गत १) प्रभाग एक मध्ये तिघिले यांच्या घरापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ३० लाख रुपये: २) प्रभाग दोन मध्ये दत्ता मोटेगावकर ते जि प शाळा हनुमंतवाडी रस्त्याचे डांबरीकरण ४० लक्ष रुपये ; ३) प्रभाग नऊ मध्ये मेन रोड ते सोसायटी नालापर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम करणे ३० लाख रुपये; ४) प्रभाग सतरा मध्ये मेन रोड ते गव्हाण पांदण रस्ता दरम्यान सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे ३५ लक्ष रुपये; ५) प्रभाग तेरा मध्ये मेन रोड ते बंडू भिकाने घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे ३० लक्ष रुपये; ६) प्रभाग सोळा मध्ये मेन रोड ते राजेवाडी पाटील पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे ५५ लक्ष रुपये; ७) प्रभाग बारा मध्ये अच्युत माळेगावकर यांचे घर ते अच्युत लवटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लक्ष रुपये; ८) प्रभाग सात मध्ये सुरकुटे यांचे घर ते बालाजी मंदिर शौचालय पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लाख रुपये; ९) प्रभाग तेरा मध्ये रेणुका नगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे ३० लाख रुपये; १०) प्रभाग चौदा मध्ये रूपचंद नगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे ३० लाख रुपये; ११) प्रभाग नऊ मध्ये बाजार मैदान परिसराचे डांबरीकरण करणे ५० लक्ष रुपये; १२) प्रभाग नऊ मध्ये मेन रोड रेणापूर येथे आदिशक्ती श्री रेणुका देवी मंदिर कमान बांधकाम करणे १५ लक्ष रुपये; १३) प्रभाग सोळा मध्ये मेन रोड ते समसापूर पांदण रस्ता दरम्यान सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे ४५ लक्ष रुपये; १४) प्रभाग एक मध्ये बालू हनवते ते चांदखा पठाण यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लक्ष रुपये; १५) प्रभाग पाच मध्ये शिवाजी शाळा ते गव्हाण रस्ता दरम्यान सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे १५ लक्ष रुपये आणि १६) प्रभाग आकरा मध्ये कातळे यांचे दुकान ते जोगदंड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लक्ष रुपये याप्रमाणे १६ कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
रेणापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आत्तापर्यंत भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून रेणापूर शहरात अनेक विकासाची कामे कार्यान्वित केली तर नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध कामे प्रगती पथावर आहेत. एवढा मोठा निधी विकास कामासाठी रेणापूरच्या इतिहासात आजपर्यंत कधीच आला नव्हता मात्र आ. कराड यांच्यामुळे आल्याने रेणापूरकरात मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून रेणापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचे रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, शेख शफी, संगायोचे सदस्य चंद्रकांत कातळे, भाजपा शहराध्यक्ष दत्ता सरवदे, सोशल मीडियाचे महेश गाडे माजी सभापती श्रीकृष्ण मोटेगावकर, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, राजकुमार आलापुरे, उत्तम चव्हाण, मारूफ आतार, अच्युत कातळे, राजकुमार रायवाडे, दिलीप चव्हाण, अंतराम चव्हाण, रफिक शिकलकर, रमेश वरवटे, संतोष राठोड, शेख अजीम, लखन आवळे, योगेश राठोड, गणेश चव्हाण, सचिन सिरसकर, हनुमंत भालेराव, उत्तम घोडके, मनोज चक्रे, बाबू राठोड, गणेश माळेगावकर, पप्पू कुडके, माऊली सातपुते, सुरज फुलारी, जगन्नाथ कातळे, हुसेन डोंगरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा