लातूर कंजूमर प्रॉडक्ट डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गिरीश गारठे ; उपाध्यक्षपदी कोटलवार

 लातूर कंजूमर प्रॉडक्ट डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गिरीश गारठे ;  उपाध्यक्षपदी कोटलवार 

लातूर :  लातूर कंजूमर प्रॉडक्ट डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गिरीश नागनाथ गारठे  यांची तर उपाध्यक्षपदी श्याम कोटलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सचिवपदी ॲड.  सुरेशप्पा बामणकर व  पुरुषोत्तम  सोनी यांची निवड करण्यात आली आहे. 
                          लातूर कंजूमर प्रॉडक्ट डीलर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष संजय अग्रवाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. असोसिएशनची उर्वरित कार्यकारी पुढीलप्रमाणे आहे - कोषाध्यक्ष : अनिल  दरगड, मेंबरशिप कमिटी चेअरमन सोमनाथ बोरलेपवार, आशिष बाहेती, एनओसी कमिटी चेअरमन सुहास बादाडे, ऍडमिनिस्ट्रेशन कमिटी चेअरमन संजय  रेवडकर, फेलोशिप कमिटी चेअरमन  तेजस शेठ,  सल्लागार व मार्गदर्शक समितीत संजय अग्रवाल , जगदीश भराडीया , शिवकांत ब्रिजवासी , संजय रेवडकर,  मोहनजी येडले यांचा समावेश करण्यात आला आहे. 
कार्यकारिणीच्या निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना गिरीश गारठे यांनी आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने आपण संघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. संघटनेच्या सदस्यांकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना व समस्यांवर तात्काळ सर्वसमावेशक तोडगा काढून योग्य तो निर्णय घेण्यास आपण कटिबद्ध असल्याचे गारठे  यांनी सांगितले.  लातूर शहरातील ज्या सदस्याकडे वितरण व्यवस्थेचे काम आहे, परंतु त्यांनी अद्यापही संघटनेचे सदस्यत्व घेतले नाही, त्यांनी तात्काळ संघटनेचे सदस्य व्हावे. जेणेकरून भविष्यात त्यांना येणाऱ्या अडचणींवर एकत्रितरित्या मात करणे शक्य होईल,असे सांगून गिरीश गारठे  यांनी नवीन सदस्यत्वासाठी संबंधितांनी सोमनाथ बोरलेपवार ( मोबा.  ९८९०८८१०११ ) व आशिष बाहेती ( मोबा.  ९८५०० २२५०० ) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनही केले. 
 असोसिएशनचे मावळते अध्यक्ष संजय अग्रवाल यांसह  सर्व व्यापारी बांधवांनी नूतन अध्यक्ष गिरीश गारठे  व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने