रामनाथ विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 रामनाथ विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा




आलमला प्रतिनिधी-श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला तालुका औसा जिल्हा लातूर येथे 8 मार्च 2023 या जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम विद्यालयातील महिला भगिनीचा रामनाथ परिवाराच्या वतीने मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांनी सौ निलंगेकर सुनंदा ,सौ हिंगणे जे आर ,सौ उकिरडे अमरजा ,या महिला शिक्षक भगिनींचा कर्मचाऱ्यांचा रामनाथ परिवाराच्यावतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुख्याध्यापिका सौ .अनिता पाटील यांचा पर्यवेक्षक श्री पी सी पाटील सर यांनी गुलाब पुष्प देऊन परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व सक्षमपणे सिद्ध करून दाखवले आहे रामनाथ विद्यालयाच्या महिला भगिनींनी आपापल्या विषयांमध्ये असंख्य विद्यार्थी घडवण्याचे कार्य केलेले आहे. म्हणून परिवाराच्या वतीने त्यांचा जागतिक महिला दिनी स्टाफ च्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री रंगनाथ अंबुलगे, प्रशांत हुरदळे, नरसिंह पंडगे ,श्याम कोकाटे ,फाजल फयाज ,ईश्वर वाडकर , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भास्कर सूर्यवंशी यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने