अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
लातूर/प्रतिनिधी:अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रात काम करताना महिलांचे मनोबल वाढावे या उद्देशाने हा सत्कार करण्यात आला.लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या न्यायाधीश औसेकर यांना सन्मानित करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस स्टेशन व बँकेतील महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करून त्यांच्या कामकाजास शुभेच्छा देण्यात आल्या.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा संघटक मंजुश्री ढेपे पाटील,सारिका मसलकर,कौशल्या मंदाडे,संगीता कुटवाडे,पल्लवी गुंड,वैशाली शिंदे,शारदा बेंद्रे,रजिया सय्यद,बने व मगर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.
टिप्पणी पोस्ट करा