23 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक,ऊसतोड कामगार व
तृतीयपंथीयांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
लातूर :- राज्याचे समाज कल्याण आयुक्त यांच्या सूचनेनुसार दिनांक 23 एप्रिल, 2023 जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथी व्यक्तींसाठी जनजागृती व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
23 एप्रिल,2023 रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (अतिविषेशोपचार रुग्णालय इमारत) हे शिबीर होणार आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथी व्यक्ती यांनी सदरील आरोग्य तपासणी शिबीरामध्ये भाग घेवून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक घुगे संदेश (भ्रमणध्वनी क्र.९४०५४४६२१६ ) व कनिष्ठ लिपीक पांढरे शिवाजी (भ्रमणध्वनी क्र.९८२३७६८१८८) यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा