जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 29 एप्रिलला प्रवेश परीक्षा सहावीतील ८० जांगासाठी परीक्षेचे आयोजन

 जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 29 एप्रिलला

 प्रवेश परीक्षा सहावीतील ८०  जांगासाठी परीक्षेचे आयोजन

लातूर :- जवाहर नवोदय विद्यालय लातूर मध्ये इयत्ता सहावीतील 80 जागा भरण्यासाठीची लेखी परीक्षा 29 एप्रिल, 2023 रोजी होणार आहे . ही परीक्षा लातूर जिल्ह्यातील 36 परीक्षा केंद्रांवर  होईल .

प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपाची असून ज्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत, त्यांचे परीक्षा  प्रवेशपत्र www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. परीक्षेवेळी या प्रवेश पत्राची  प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे. परिक्षार्थीनी आपल्या प्रवेश पत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिनांक 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी साडेदहा  वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पालक व ते शिकत असलेल्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांनी याबाबत मुलांना अवगत करावे.  अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी . शेख  (भ्रमणध्वनी क्र.९८१७८३४९३०) किंवा व्ही . एच . खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र.९८६०५६८८४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय लातूरचे प्राचार्य आर रामु यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने