देशाला महामानवाचे विचार आत्मसात करण्याची गरज - डॉ. भीमराव पाटील


 देशाला महामानवाचे विचार आत्मसात करण्याची गरज - डॉ. भीमराव पाटील 






           औसा (प्रतिनिधी ): भारतातील समाज हा अनेक रूढी, परंपरा , अंधश्रद्धा ,भेदभाव , जातीयता इत्यादींनी त्रस्त होता अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य महात्मा बसवेश्वर महाराजानी केले. त्याच्या नीती ,मूल्य ,वचन यावरती खूप मोलाचे मार्गदर्शन करत पुढे म्हणाले  विद्यार्थी हा मार्कवान नाही तर गुणवान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील पाली विभागाचे डॉ.भीमराव पाटील .यांनी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जगत ज्योती  महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त ते बोलत होते .
                 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.भीमराव पाटील,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , राठोड उपसरपंच सलीम शेख , प्राचार्या श्यामलीला बावगे (जेवळे) इत्यादी मंचावर उपस्थित होते . 
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या वचनात असलेले  सदाचार स्वतंत्र समता ,बंधुत्व आणि मौल्यवान  विचार यावर कोशाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रकाश टाकला .  
               हा कार्यक्रम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत घेण्यात आला. यावेळी रासोयो कार्यक्रम अधिकारी प्रा गणेश बनसोडे , प्रा. अजगुंडे बी आर  ,  विद्यार्थी सी आर- डोंगरे अविष्कार, एल आर- बिराजदार साक्षी, सोलापुरे माणशी, उगिले वैष्णवी, बिराजदार कृष्णकांत, सुरणार वैष्णवी यांच्यसह लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परळे भक्ती यांनी केले तर आभारप्रदर्शन स्वामी ऋतुजा यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने