औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ९३ शिक्षिकांनी केले रक्तदान

  औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ९३   शिक्षिकांनी केले रक्तदान












औसा :  औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा ४७ वा वर्धापन दिन, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या तिन्हींचे औचित्य साधून तसेच उन्हाळयाच्या तीव्रतेमुळे लातूर जिल्ह्यातील रुग्णांना होणाऱ्या रक्तपेढीतील रक्ताच्या तुटवड्यामुळे पतसंस्थेच्या शिक्षक संचालकांनी आणि शिक्षक सभासदांनी मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३ रोजी पतसंस्थेच्या शिक्षक भवन सभागृहात मोठ्या उत्साहात रक्तदान केले.
या  रक्तदान शिबीराचे उद्घाटन लातूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंतराव वडगावे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक किरण पाटील, मोहन माकणे, माधव शेंद्रे, बसवेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांनी आयुष्यमान भारत (केंद्र सरकार) हि योजना लातूर जिल्ह्यात चांगली प्रभावी राबिवली म्हणून लातूर जिल्ह्याला देशात पीएम आवार्ड २०२२ चा प्रथम क्रमांक मिळाला असल्याचे डॉ. हनुमंतराव वडगावे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कार्यातील अनुभव सांगत असताना म्हणाले की, आपण काम किती करतो हे महत्वाचे नसून किती मन लावून पूर्ण करतो हे महत्त्वाचे असते. आज पर्यतच्या माझ्या काळात असली उत्तम उपक्रम राबवून पारदर्शक कारभार करणारी पतसंस्था पाहिली नसल्याचे सांगून अशा उन्हाळयाच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षक रक्तदान करत असल्यामुळे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवाद्गार काढले. याप्रसंगी अशाच प्रकारे दर ६ महिन्याला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे असे सुचवून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 
           कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन हरीश आयतनबोने तर सूत्रसंचालन संचालक धीरजकुमार रूकमे यांनी केले तसेच अध्यक्षीय समारोप व आभार पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे सचिव संजय जगताप, संचालक युसूफ पिरजादे, मधुकर गोरे, रमेश जाधव, महेश कांबळे, अमोल शेळके, संचालिका मंदाकिनी माने, संगीता कानडे, माजी संचालक संजय रोडगे, सोमनाथ कांबळे, पतसंस्थेचे कर्मचारी मल्हारी कांबळे, विनय आयतनबोने तसेच संजीवनी ब्लड बँक लातूरचे चेअरमन विशाल सावंत, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. महादेव झिले, टेक्नीकल सुपरवायझर किरण कांबळे, लब टेक्निशियन शिवानी गायकवाड, मनीषा आथराम, ऋतुजा करपते यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरास १०८ शिक्षकांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी काही शिक्षकांना बी.पी., शुगर, एच.बी. इत्यादी कारणामुळे रक्तदान करता आले नसून प्रत्येक्षात भर उन्हाळ्यात ९३ शिक्षक/ शिक्षिकांनी रक्तदान केले. संस्थेच्या वतीने सर्व रक्तदात्यांना अभिनंदन पत्र देवून आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने