बियाणे, खते व किटकनाशके अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत

 


बियाणे, खते व किटकनाशके अधिकृत

विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत

 

                                   

        लातूर:  शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह खरेदी करण्याचे आवाहन लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

        शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना - गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट भेसळयुक्त बियाणे, खते व किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह खरेदी करावे. खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडेसे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सीलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करुन घ्यावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी.

                त्याचबरोबर कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करुन घ्यावी. आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी,  ई-मेल, एसएमएस इ. व्दारे शासनाच्या गतिमान गुण नियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. तसेच कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा. निविष्ठा केंद्रांनी कापूस बियाणे, खताच्या किंमतीचे डीजीटल इतर प्रकारचे बोर्ड तयार करुन लावावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने