भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल मध्ये साजरी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल मध्ये साजरी

   औसा/प्रतिनिधी-  बोधिसत्व, कायदे पंडित भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल मध्ये साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जवळे ,संचालक नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूरचे प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला आणि एसव्ही एसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम हे प्रमुख उपस्थित होते त्यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्प माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले , तसेच संचालक नंदकिशोर बावगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विषयी ग्रंथ महाविद्यालयातील ग्रंथालयाला देणगी देऊ असे प्रतिपादन केले. व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर , एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय ,लातूर कॉलेज ऑफ ज्ञानसागर विद्यालय हासेगाव, गुरुनाथआप्पा बावगे इंटरनॅशनल स्कूल हासेगाव या सर्व युनिटचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने