जयक्रांती महाविद्यालयात महामानवाला वाचनातून अभिवादन

 जयक्रांती महाविद्यालयात महामानवाला वाचनातून अभिवादन





लातूर: येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 14/04/2023 सकाळी 08: 30 वा. जयक्रांती महाविद्यालयातील सभागृहामध्ये सलग 18 तास वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून  ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी सामूहिक वाचन उपक्रमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रा. गोविंदरावजी घार, प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, मंचावर कला विभागाचे समन्वयक डॉ. राजेश्वर खाकरे, डॉ. सतीश डांगे, प्रा. रीता कदम, डॉ. केशव आलगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रा. गोविंदराव घार सर म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला गुलामगिरीचे झोकड फेकून देऊन, सन्मानाने जगण्याचे बळ दिले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांपासून भारत स्वतंत्र स्वातंत्र्य लढ्यामुळे झाला, परंतु गुलामगिरीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे झाला असे मत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समता, न्याय, बंधुत्व समाजामध्ये प्रस्थापित करणारे आहेत आणि त्या विचारांची कास धरून चालणे चालणारा व्यक्ती हा खऱ्या अर्थाने सुदृढ समाज निर्माण करणारा समाज सुधारक आहे, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे म्हणाले की, समाजामध्ये जर वैचारिक सुदृढता आणायचे असेल तर आपण वाचन संस्कृती जोपासणे अतिशय आवश्यक आहे. वाचनाने माणसाचे शरीर आणि मन प्रगल्भ बनते, विचार करण्याच्या कक्षा रुंदावल्या जातात, माणूस स्वतःपुरता विचार न करता सर्वसमावेशक विचार करायला शिकतो आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने समाज सुदृढ होतो, असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. अविनाश पवार, डॉ. रामेश्वर स्वामी, डॉ. माधवी बादाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व्यक्त केले. तसेच प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. रीता कदम यांनी केले सूत्रसंचालन केशव आलगुले तर आभार डॉ. राजेश्वर खाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजाभाऊ पवार, डॉ. प्रमोद चव्हाण, सौ संजीवनी मराठे, सह्याद इब्राहिम, अमित गारोळे, शरद इगवे, सपना पैठने, राठोड लक्ष्मी, यांनी प्रयत्न केले. या उपक्रमामध्ये शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रंथालयातील वेगवेगळी दुर्मिळ ग्रंथाचे वाचन केले आणि महामानवाला खऱ्या अर्थाने वाचन करून अभिवादन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने