सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचा सांस्कृतिक पुरस्काराने गौरव

 सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचा सांस्कृतिक पुरस्काराने गौरव



मुंबई (प्रतिनिधी):श्री. सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाचा 'राज्य सांस्कृतिक पुरस्कार' जाहीर झालेला असून सोमवार दि. १० एप्रिल रोजी मुंबईत एका खास समारंभात हा प्रदान करण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, नाटक, समाजप्रबोधन, लोककला, किर्तन, शाहीरी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना असा सांस्कृतिक पुरस्कार घोषीत करण्यात येतो.किर्तन प्रबोधन जनजागृती आदी. भागवत संप्रदायात उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. गुरुबाबा महाराजांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला व या पुरस्काराचे वितरण खास सोहळ्यात दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कलांगन, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान केला जाणार आहे.सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकरांना हा सन्मानाचा राज्यशासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथसंस्थानच्या लाखो शिष्य समुदायात आनंद व्यक्त होतो आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने