व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विष्णू आष्टीकर, प्रदेश सरचिटणीसपदी वामन पाठक यांची निवड

 व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विष्णू आष्टीकर, प्रदेश सरचिटणीसपदी वामन पाठक यांची निवड


व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विष्णू आष्टीकर,तर
प्रदेश सरचिटणीसपदी  वामन पाठक यांची  निवड.

लातूर : व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी सा.फोटो क्राईम  आणि फोटो क्राईम न्यूज चे मुख्य संपादक विष्णू आष्टीकर यांची तर प्रदेश सरचिटणीसपदी सा.मनोकामनाचे  वामन पाठक यांची निवड करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या आदेशावरून संघटनेच्या साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना निवड केल्याचे पत्र दिले आहे. संघटनेचे बळकटीकरण व संघटनेची ध्येयधोरणे पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्री आष्टीकर व श्री पाठक यांची निवड केली आहे. विष्णू आष्टीकर व वामन पाठक यांच्या निवडीचे स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फड, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर, प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, जिल्हा सरचिटणीस संगम कोटलवार, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार, सुशांत सांगावे व जिल्हाभरातील पत्रकारांनी केले आहे. दरम्यान संघटनेच्या साप्ताहिक विभाग जिल्हा कार्यकारिणीची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष विष्णू आष्टीकर यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने