लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ३६ कामासाठी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍ना‍तून तांडा विकास योजने अंतर्गत १ कोटी ९७ लक्ष रूपयाचा निधी मंजूर

 लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ३६ कामासाठी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍ना‍तून तांडा विकास योजने अंतर्गत १ कोटी ९७ लक्ष रूपयाचा निधी मंजूर

             लातूर दि.०८- जिल्‍हा वार्षीक योजना २०२२-२३ अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 3६ विविध कामासाठी तांडा विकास योजने अंतर्गत भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा  कराड यांच्‍या प्रयत्‍नातून १ कोटी ९७ लक्ष रूपये निधी नुकताच मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने तांडा वस्तीसह अनेक गावातील भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत

              लातूर ग्रामीण मतदार संघातील बंजारा व इतर वस्तीत सिमेंट रस्तापेव्हर ब्लॉकसामाजिक सभागृहपथदिवेपाणीपुरवठा यासह विविध विकास कामे व्हावीत यासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. गिरीशजी महाजन साहेब यांच्‍याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यानुसार जिल्‍हा वार्षीक योजना २०२२-२३ अंतर्गत लातूर तालुक्यातील १ कोटी ५९ लक्ष रुपये रेणापूर तालुक्यासाठी २५ लक्ष रुपये आणि भादा सर्कल मध्ये १३ लक्ष रुपये याप्रमाणे लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध ३६ कामासाठी १कोटी ९७ लक्ष रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.

           सदरील मंजूर कामातून सलगरा बु. धनगरवाडा एलईडी पथदिवे बसवणे ५ लक्षअंकोली धनगर वस्‍ती सिमेंट कॉक्रीट रस्‍ता  करणे ६ लक्षचिंचोलीराव सेवारामनगर सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ६ लक्षसलगरा बु. लमान तांडा दगडवाडी पथदिवे बसवणे ५ लक्षसलगरा बु. धनगरवाडा पथदिवे बसवणे ६ लक्षसलगरा बु. नाईक नगर पथदिवे बसवणे ५ लक्षमुशिराबाद कोरे तांडा एलईडी पथदिवे बसवणे ५ लक्षभोयरा आहिल्‍यादेवी नगर पथदिवे बसवणे ३ लक्षमुशिराबाद कोरे तांडा जोडरस्‍ता करणे ७ लक्षसलगरा बु. पाथरट वस्‍ती साई नगर एलईडी पथदिवे बसवणे ५ लक्षशिराळा बिरूदेव नगर पथदिवे बसवणे ७ लक्षचिंचोली ब. तांडा वस्‍ती पथदिवे बसवणे ३ लक्षगाधवड अहिल्‍यादेवी होळकर नगर सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ७ लक्षसलगरा खु. धनगर वाडा जोडरस्‍ता करणे ७ लक्षबोरी अहिल्‍यादेवी होळकर नगर पथदिवे बसवणे ५ लक्षकारसा अहिल्‍यादेवी होळकर वस्‍ती पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ७ लक्षकासार जवळा विजया नगर सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ७ लक्षसलगरा खु. धनगर वाडा एलईडी पथदिवे बसवणे ५ लक्षजेवळी धनगर नगर सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ६ लक्षकारसा अहिल्‍यादेवी होळकर नगर पथदिवे बसवणे ५ लक्षमुशिराबाद मल्‍हाराव  होळकर नगर पथदिवे बसवणे ५ लक्षसलगरा बु महादेव मंदिर गल्‍ली एलईडी पथदिवे बसवणे ५ लक्षमुशिराबाद मल्‍हाराव होळकर नगर जोडरस्‍ता करणे ७ लक्षसलगरा बु. धनगर नगर पाथरवट वस्‍ती एलईडी पथदिवे बसवणे ४ लक्षसमदर्गा भामटा राजपुत वस्‍ती पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ता करणे ६ लक्षहारवाडी खंडोबा नगर सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ६ लक्षगरसुळी तांडा सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ३ लक्षसिंदाळवाडी टेंबी शिवाजीनगर तांडा सेवालाल भवन बांधणे ७ लक्षजवळगा धनगर वस्‍ती  सामाजिक सभागृह बांधणे ७ लक्षगातेगाव अहिल्‍यादेवी होळकर नगर सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ६ लक्षसलगरा बु. लमाण तांडा दगडवाडी नाली बांधकाम करणे ७ लक्षवाला धनगर वस्‍ती सिमेंट कॉक्रीट रस्‍ता करणे ६ लक्षसलगरा बु. लमाणतांडा दगडवाडी पथदिवे बसवणे ३ लक्षपोहरेगाव लमाणतांडा पाणी पुरवठा करणे ३ लक्षसलगरा बु. लमाणतांडा दगडवाडी नाली बांधकाम करणे ७ लक्षकासार जवळा विजया नगर पथदिवे बसवणे ३ लक्ष रुपये याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने त्या त्या वस्तीतील नागरिकासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आ. रमेशआप्पा कराड यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने