महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार जाहीर

महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार जाहीर




औसा / प्रतिनिधी-कृषी उत्पन्न बाजार समिती औसाच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट एकत्रित येवून महाविकास आघाडी  औसा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविणार असल्याची माहिती महाविकास आघाडी शेतकरी पॅनलचे प्रमुख अ‍ॅड.श्रीपतराव काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली व पॅनलचे १६ उमेदवार घोषित केले.


सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून नारायण लक्ष्मण लोखंडे, राजेंद्र हरिश्चंद्र भोसले, किशोर अरंिवद जाधव, प्रकाश रघुनाथ भोंग, सचिन दगडू गिराम, अ‍ॅड. श्रीकांत शाहूराज सूर्यवंशी, दत्तोपंत दिगंबर सूर्यवंशी, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून अहमद तांबोळी, सहकारी संस्था भटक्या जमाती मतदार संघातून दिलीप विश्वनाथ लवटे सहकारी संस्था महिला मतदारसंघातून रूक्­मीनबाई श्रीधर साळुंखे व शिवगंगा व्यंकट साळुंखे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून सतीश रघुनाथ शिंदे, विठ्ठल गुरप्पा बेटजवळगे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून नामदेव माने, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून बाबासाहेब सदाशिव गायकवाड.हमालमापाडी मतदारसंघातून पाशा आमिन शेख या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले.

सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ.अमित देशमुख व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील शिवसेनेचे खा.ओमप्रकाश राजेनिंबळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करुन या निवडणूकीतील उमेदवार व निवडणूकीतील धोरण ठरविण्यात आले आहे, यावेळी ॲड.श्रीपतराव काकडे, श्रीशैल उटगे, संतोष सोमवंशी, नारायण लोखंडे, शाम भोसले,सुभाष पवार, सतीश शिंदे, बालाजी बिराजदार, श्रीकांत सुर्यवंशी, बाबासाहेब गायकवाड,बसवराज धाराशिवे, दत्तोपंत सुर्यवंशी किशोर जाधव,विश्वास काळे,अरुण मुकडे,काँग्रेसचे सय्यद खादर आदी. उपस्थित होते. व्यापारी मतदारसंघातील दोन जागा आघाडीने व्यापारी संघटनाच्या विनंती वरुन लढविणार नसल्याचे सांगितले. या जागा व्यापारी संघटनासाठी दिल्या आसल्याचे अ‍ॅड काकडे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने