जिल्हा युवा पुरस्कारासाठी 24 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 24 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर- राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार  जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक व युवतींना व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून 2019-20, 2020-21, 2021-22,2022-23 या चार वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 24 एप्रिल, 2023 पर्यंत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावेत.  अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो.नं.9975576600) यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने