लक्ष्मी अर्बन बँकेची यशस्वी वाटचाल

लक्ष्मी अर्बन बँकेची यशस्वी वाटचाल...

मराठवाड्यातील नामांकित, मागील २५ वर्षापासून सातत्याने व्यापारी, उद्योगपती,कष्टकरी व सर्व प्रकारच्या गरजू लोकांना आवर्जून मदत करणारी, एक अग्रणी बँक म्हणून नावलौकिक मिळवलेली लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस साल २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात एकूण २ कोटी ४७ लक्ष नफा झाल्याची माहिती बँकेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
          बँकेचा एकूण व्यवसाय २५८.२७ कोटी रुपये आहे. बँकेने  शुन्य टक्के  एनपीए  राखण्यात यश मिळवले आहे. बँकेच्या एकूण ठेवी १५३.२६ कोटी व कर्ज १०५.०१ कोटी रुपये आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत समाधानकारक प्रगती केली आहे. बँकेस मागील सतत दोन वर्षापासून बँको कडून उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँकेच्या एकूण ८ शाखा कार्यरत असून सर्वच शाखेतून सभासद व ग्राहकांची अतिशय मोलाची साथ बँकेस मिळत आहे. बँकेने आधुनिक बँकिंग सेवेस प्राधान्य दिले असून मोबाईल बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेने Debit Card,IMPS, UPI अशा सुविधा सुरु करण्यास परवानगी दिली आहे, लवकरच या सर्व सुविधा सुरू होतील.
        बँकेच्या या प्रगतीमध्ये सभासद,खातेदार, ठेवीदार व हितचिंतकांची भक्कम साथ असून बँक प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सतीश भोसले, सर्व संचालक मंडळ व प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी सर्व सभासद व ग्राहकांचे आभार व्यक्त केले आहेत तसेच नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने