महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 4001 व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रुपये 3001 व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक रुपये 2001 व स्मृतिचिन्ह आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 1001 व स्मृतिचिन्ह तसेच सहभागी सर्व स्पर्धांना प्रमाणपत्र दिले जाईल.
ही स्पर्धा ही एक दिवसाची असेल, स्पर्धेसाठी एका महाविद्यालयातून एक किंवा दोन स्पर्धा पाठवावे, स्पर्धकाजवळ महाविद्यालयाच्या प्राचार्याचे पत्र व स्वतःची ओळखपत्र असणे आवश्यक आहे, प्रत्येक स्पर्धकासाठी प्रवेश शुल्क रुपये 150 असेल, स्पर्धेसाठी सात मिनिट वेळ देण्यात येईल, स्पर्धेसंबंधी परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, स्पर्धेसंबंधी सर्व अंतिम अधिकार आयोजक समिती व प्राचार्याकडे असतील, ही स्पर्धा मराठी भाषेतून असेल, स्पर्धकांच्या एक वेळच्या भोजनाची व्यवस्था महाविद्यालयाकडून नि:शुल्क केली जाईल, आपला महाविद्यालयातून पाठवण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती आमच्या महाविद्यालयला पूर्व सूचना देवून कळवावी त्यानुसार त्यांची व्यवस्था करणे सुलभ होईल, स्पर्धकाचे वय 27 वर्षापेक्षा जास्त नसावे, स्पर्धकांनी नाव नोंदणी बरोबर आधार कार्ड काढणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन प्राचार्य डॉ. दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, स्पर्धा संयोजक डॉ. सदाशिव दंदे, डॉ. आनंद शेवाळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. कल्याण कांबळे यांच्यासह संयोजन समितीतील सदस्य डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. संजय गवई, डॉ. विनायक वाघमारे, प्रा. व्यंकट दुडिले, प्रा. किसनाथ कुडके, प्रा. रूपाली हलवाई, प्रा. केशव बिरादार, प्रा.प्रभाकर इगवे, डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रा. शिवानंद स्वामी, डॉ. उमा कडगे, अॅड. इरफान शेख, डॉ. शितल येरुळे, डॉ. सचिन हंचाटे आणि प्रा. सुरेंद्र स्वामी आदींनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा