महात्मा फुले यांच्यामुळे मुली शिक्षणाच्या प्रवाहात-प्राचार्य केंद्रे

 राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा फुले यांच्यामुळे मुली शिक्षणाच्या प्रवाहात-प्राचार्य केंद्रे


लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य केंद्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म दि. ११ एप्रिल १८२७ रोजी तर दि. २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचा मृत्यू झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांना १९ व्या शतकातील मुख्य समाजसुधारक मानले जाते. भारतीय समाजात पसरलेल्या बर्‍याच वाईट गोष्टी दूर करण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. अस्पृश्यता महिला शिक्षण विधवाविवाह आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी महात्मा फुले या महान समाजसुधारकाने उल्लेखनीय काम केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातिभेद, लिंगभेद, उच्च - नीच विरुद्ध मोठी लढाई लढली. एवढेच नव्हे तर न्याय आणि समानतेच्या मुद्यावर, मूल्यावर आधारीत समाजाची दृष्टी त्यांनी मांडली. ते महिलांच्या शिक्षणाचे प्रबळ वकील होते. १९ व्या शतकात स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे. त्यामुळे महात्मा फुले यांनी मुलींसाठीची देशातील पहिली शाळा पुण्यात बनवली. त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिकवले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका ठरल्या. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी साजरी केली.
या अभिवादन कार्यक्रमास संस्थाध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. बी. बी. खटके, प्रा. सुधाकर धुमाळ, शिक्षक राजीव मुंढे, मदन धुमाळ, सुनीता जवळे, शोभा कांबळे, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते, विष्णू कराड आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने