खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी रेणापूर बाजार समितीवर भाजपाला एकहाती सत्ता द्या- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी रेणापूर बाजार समितीवर भाजपाला एकहाती सत्ता द्या- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

दि.08-04-2023
लातूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या सभापती पदावर काम करत असताना लातूर बरोबरच मुरूड, रेणापूर, पानगाव, उपबाजारपेठेला सुविधा मिळवून देण्याचे काम आपण त्यावेळी केलेले आहे. रेणापूर बाजारपेठेअंतर्गत येणार्‍या व्यापार्‍यांना हक्‍काचे प्लॉटही दिले. परंतु त्या भागाचा पाहिजे तेवढा विकास नंतरच्या कालावधीत सत्ताधार्‍यांनी केलेला नाही. देशमुखाच्या ताब्यात असलेल्या रेणापूर बाजार समितीच्या माध्यमातून रस्ते, पाणी, लाईट अशा मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत.  त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी रेणापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीवर भाजपाला एकहाती सत्ता द्या आपण चौफेर विकास करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केेले.
यावेळी ते भाजपाच्यावतीने कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुच्या पार्श्‍वभूमिवर आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी या बैठकीला शेतकरी विकास सोसायटी गट, ग्रामपंचायत गट व व्यापारी गट यामधील उमेदवारांसह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, रेणापूर पंचायत समितीचे माजी गटनेते आप्पासाहेब  पाटील, गोविंद पंडगे, रवि चव्हाण, माजी सरपंच सूर्यकांतराव मुंडे, बाबुराव मुंडे, राजेंद्र सुळ, विजयकुमार एकुरके, शामराव राजे, माधवराव राजे, अ‍ॅड.विठ्ठल खोडके, हणमंत पाटील, श्रीकृष्ण सोमवंशी, श्रीमंत सोमवंशी, भगवान पाटील, देवानंद शिंदे, प्रताप शिंदे, सुरेखा शिंदे, विकास मुंडे, शालीग्राम भंडे, शहाजी काळे, शाम भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, रेणापूर बाजार समितीमध्ये मालाची आवक वाढवून या कार्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांध्ये विश्‍वास निर्माण करून व्यापारी व शेतमजूराला उत्पन्‍न वाढवून कर्मचार्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू याबरोबरच मुरूड बाजारपेठेप्रमाणे रेणापूर मार्केट कमिटीमध्ये ई-मार्केट सेवा सुरू करून शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम आपण यापुढील कालावधीत करू असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.
यावेळी रेणापूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी, गाडीवान मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने