श्री रामनाथ मध्ये एल.पी. बिराजदार व राम कापसे यांचा निरोप समारंभ संपन्न

श्री रामनाथ मध्ये एल.पी. बिराजदार व राम कापसे यांचा निरोप समारंभ संपन्न

आलमला: श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे  रामनाथ विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री बिराजदार एल.पी. व अलमला येथील रहिवासी व पंचायत समिती औसा येथे शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून कार्य केलेले.. श्री राम कापसे सर यांचा सेवापुर्ती निमित्त निरोप समारंभ व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे माजी सचिव प्रा. जी.एम. धाराशिवे सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, श्रीमती मुक्ताताई पाटील, एडवोकेट उमेश पाटील, श्री प्रभाकर कापसे सर, सोपान काका आलमलेकर, मन्मथअप्पा धाराशिवे, श्री शिवाजी अंबुलगे, श्री महादेव खिचडे, श्री बसवराज धाराशिवे, श्री कैलास कापसे, श्री शिवकुमार पाटील हे सर्वजण उपस्थित होते. संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्तींना भेट वस्तू देऊन त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व माजी खेळाडू यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यातर्फे चांदीची गदा देऊन सरांचा सत्कार करण्यात आला. सर्व माजी खेळाडूंनी मिळून प्रथम गावातून शाळेपर्यंत सरांची भव्य दिव्य मिरवणूक काढली होती, त्यात फटाक्यांची आतिषबाजी व हलगी पथक हे विशेष होते. सर्व माजी खेळाडूंच्या वतीने सर्व उपस्थितांची भोजनाची उत्तम सोयही करण्यात आली होती. माजी खेळाडू मध्ये रोहिदास माने, तानाजी खलंग्रे, लक्ष्मण शिंदे, किरण पाटील, गणेश स्वामी, भडके श्रीकांत, जडगे नितीन, तानाजी साळुंखे, शिवाजी बोळंगे, जाधव विकास, युवराज जाधव, संतोष इगवे, नेताजी वाघमारे, शिवशंकर भावले, महादेव भंगे, बालाजी ससाने, महादेव ससाने, सिद्धेश्वर चरकपल्ले, रत्नाप्पा आंबुलगे, अंबादास माने, बबन काळे आदि सर्व खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पी.सी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री भारत दांडगे यांनी मांडले. या कार्यक्रमाला एल.पी. बिराजदार सरांचे सर्व कुटुंबीय व नातेवाईक, मित्रमंडळी तसेच आलमला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील अनिता, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने