व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या प्रदेश सरचिटणीसपदी वामन पाठक यांची निवड

 व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या प्रदेश सरचिटणीसपदी वामन पाठक यांची निवड





लातूर-येथील सा. मनोकामनाचे संपादक वामन पाठक यांची व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग)च्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पत्रकारितेच्या क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पत्रकार आणि पत्रकारीता क्षेत्रावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, शासन वृतपत्र क्षेत्रातील पत्रकारासह मिडीयाचा केवळ त्यांच्या कामकाजाला प्रसिध्दी देण्यासाठी उपयोग करत आहे. आणि पत्रकारांना सोई सुविधा देण्याचे मात्र टाळत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया कार्यरत आहे. यासाठी वेगवेगळया क्षेत्रातील विंग बनवण्यात आले आहेत. यातील साप्ताहिक विंगच्या प्रदेश सरचिटणीसपदी लातूर येथील साप्ताहिक मनोकामनाचे संपादक वामन कालिदासराव पाठक यांची व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या प्रदेश सरचिटणीसपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, साप्ताहिक विंगचे प्रदेश अध्यक्ष विनोद बोरे यांनी निवड जाहिर केली आहे.
वामन पाठक हे गेल्या 35 वर्षा पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सा. मनोकामनाच्या संपादकपदी गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी आजपर्यंतच्या कार्यकालात दै. मराठवाडा,दै. एकमत दै. सकाळ, दै. केसरी, दै. मापदंड, पोलिस विश्‍व साठी तालुका प्रतिनिधी तर दै. गावकरी, दै. सोलापुर तरूण भारत (जिल्हाप्रतिनीधी), दै. एकमत (उपसंपादक), म्हणून काम केले आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही त्यांनी आपले कार्य चालवले आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून सा. मनोकामनाचे संपदकपदावर कार्यरत आहेत. त्यांनी औसा तालुका मराठी पत्रकार संघ, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीत सहसचिव पदावर काम केले आहे. त्यांना पत्रकारांच्या विविध अडचणीची जाणीव आहे. त्यांना आजपर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत राज्यस्तरावरील, विभागीयस्तरावरील, जिल्हास्तरावरील, तालुकापातळीवरील विविध सामाजिक संघटना, पत्रकार संघटनांकडून पुरस्कारीत करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या प्रदेश सरचिटणीसपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, साप्ताहिक विंगचे प्रदेश अध्यक्ष विनोद बोरे यांनी निवड जाहिर केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे राज्यभरातून कौतूक व अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने