माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची ख्रिश्चन एकता मंच लातूर शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट
लातूर/प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी ख्रिश्चन एकता मंच लातूर शिष्टमंडळाने भेट घेतली. लातूर शहरातील ख्रिश्चन समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून लातूर शहरातील गुडन्यूज चर्च समोरील मोकळ्या जागेत सभागृह बांधणेबाबत आमदार अमित विलासराव देशमुख यांना निवेदन सादर केले. यावेळी ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रभूदास दुप्ते,प्रदीप दुप्ते, कृष्णा चव्हाण, पौल वाजपटे, शुभम वनवे, संदीप दुप्ते, विकास आनंदवाड, जितेंद्र रायगुडे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा