मुक्तांगण इंग्लिश स्कुल मध्ये चिमुकल्यांनी साजरा केला गुड फ्रायडे

 मुक्तांगण इंग्लिश स्कुल मध्ये चिमुकल्यांनी साजरा केला गुड फ्रायडे




 

                  लातूर-येथील विशालनगर परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये गुड फ्रायडे साजरा करण्यात आला.या वेळी गुड फ्रायडे निमित्त शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख समवेत सर्व शिक्षिकांनी येशू ख्रिस्ताच्या फोटोसमोर मेणबत्ती प्रज्वलित केली.याप्रसंगी गुड फ्रायडे विषयी शाळेचे शिक्षिका प्रणिता कांबळे यांनी माहिती दिली. गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिश्चन धर्मात या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले होते. याची आठवण करून दिली.  या कार्यक्रमाचे सूत्र संचलन शाळेच्या शिक्षिका किर्ती पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने