भरत पवारला विद्यापीठाचा रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर

  भरत पवारला विद्यापीठाचा रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर


युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने महाविद्यालय युवकांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याच्या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये राबवली जाते. त्याचप्रमाणे दयानंद कला महाविद्यालय,लातूर. येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अविरतपणे चालू आहे. त्याच विभागाचा  भरत महादेव पवार या स्वयंसेवकास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड. यांच्या वतीने देण्यात येणारा 2021- 22 चा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
     भरत पवार हा मूळचा गव्हाण तालुका रेणापुर येथील रहिवासी आहे. त्याने उच्च शिक्षणासाठी दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व  उच्च शिक्षणाबरोबरच त्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागांमध्ये सुद्धा प्रवेश घेतला. 2020- 21 व 21- 22 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये व वार्षिक निवासी शिबिर तसेच जिल्हास्तरीय, विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरीय व  राष्ट्रीय स्तरावरील शिबिरामध्ये हिरारीने यशस्वी सहभाग नोंदवला. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद असताना त्याचे मात्र राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य नित्यनेमाने चालूच राहिले. त्याने कोविड महामारीच्या काळात स्वखर्चातून मास्क व सानिटायझर वितरण, आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून देणे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य वितरण, अँटी करुन ऑफर्स मध्ये सहभाग, निर्जंतुकीकरणांमध्ये सहभाग, लसीकरण मोहिमेत लसीकरणाबाबत जनजागृती व नोंदणी करणे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'माझी कुटुंब माझी जबाबदारी' या गृह भेटी स्पर्धेमध्ये त्याने रेणापूर तालुक्यातील आठ गावांना भेटी देऊन 2009 कुटुंबाचा सर्वे केला व अनुक्रमे महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. यासोबतच पल्स पोलिओ अभियान, एचआयव्ही जनजागृती अभियान, सडक सुरक्षा जनजागृती अभियान, स्वच्छता अभियान या अभियानात सहभाग नोंदवून अनेक उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले 'युवा कोविड योद्धा या पुस्तकांमध्ये' भरत पवार च्या कोविड मधल्या कार्यावर स्वतंत्र प्रकरण आहे.
त्याला 2020-21 चा महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आली आहे. या अनुभवाचा या कार्याचा फायदा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम राबवण्यासाठी व्हावा म्हणून त्याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड. राष्ट्रीय सेवा योजना विभागावर सल्लागार म्हणून सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे.
     महाविद्यालयीन जीवनामध्ये भरत पवारांनी केलेल्या या उल्लेखनीय, अनुकरणीय, प्रशंसनीय, निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेची दखल घेऊन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड. राष्ट्रीय सेवा योजने विभागाच्या वतीने भरत पवार याला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
     दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीजीरमण लाहोटी, उपाध्यक्ष मा.अरविंद सोनवणे ,मा.ललितभाई शहा ,मा.रमेशकुमार राठी ,सचिव रमेश बियाणी संयुक्त सचिव मा.सुरेश जैन कोषाध्यक्ष संजय बोरा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड,  उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्निकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम डॉ.सुनिता सांगोले डॉ.मच्छिंद्र खंडागळे डॉ.संदिपान जगदाळे डॉ.संतोष पाटील प्रा.महेश जंगापल्ले. इत्यादींनी भरतचे अभिनंदन केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने