डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमीत्त VJTI माटुंगा, मुंबई येथे सलग १८ तास अभ्यास अभियान

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमीत्त

 VJTI माटुंगा, मुंबई येथे सलग १८ तास अभ्यास अभियान 





मुंबई-दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील व्हीजेटीय माटुंगा, मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त्य सलग १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विद्यार्थी जीवनात आणि नंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यात १८ तास अभ्यास करायचे. संस्थेतील विद्यार्थांनी सुद्धा बाबासाहेबाप्रमाणे १८ तास अभ्यास करून जयंती साजरी करून हे अभियान यशश्वी केले. बाबासाहेबांप्रती  कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच, बाबासाहेबांनी मानवतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या अपार कष्टांची आठवण करणे हा अभियानाचा उद्देश
होता,  बाबासाहेब समजून घेतांना, त्यांनी केलेल्या कष्टांची अनुभूती घेतांना, आपणही स्व-निश्चयाने  १८ तास सलग अभ्यास करून जयंती साजरी करूया असे विद्यार्थ्या, शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी ठरवले. या अभ्यासकाळात विद्यार्थ्यांना पुस्तके, चहा, नाश्ता, आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. 
सदर अभियान यशश्वी करण्यात डॉ वाल्मिक निकम, डॉ विनोद सूर्यवंशी, डॉ के के सांगळे, अधिष्ठाता, आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान होते. ग्रंथालय कर्मचारी संजय  कांबळे, प्रकाश शिंदे, शिवानी शेट्ये तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थाना सेवा दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने