कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत यश

 कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत यश

  लातूर-फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येथील कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत ‘कॉक्सिट’ च्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
  महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून गायत्री मोरे या विद्यार्थिनीने ७६.८३ टक्के गुण घेत महाविद्यालयातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. ओम देवडे याने ७२. ५० टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर सानिया पठाण हिने ७२ टक्के गुण घेत तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून विठ्ठल चेवले याने ८०. १७ टक्के गुण मिळविले आहेत. तो महाविद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. संकेत वाकडे याने ७९. ३३ टक्के गुण घेत तो द्वितीय आला आहे. तर सायली मोटेगावकर हिने ७२. ५० टक्के गुण घेतले आहेत. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८. ५७ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.६६ टक्के निकाल लागला आहे.
 यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, उपाध्यक्ष एल. एम. पाटील, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या तब्बसूम मोमीन, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, प्रबंधक संतोष कांबळे, अधीक्षक प्रदीप कावळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने