किनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री

 किनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री

किनगाव : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील किनगाव व किनगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून अवैध्य मार्गाने गुटक्याची अवैध विक्री होत आहे. मात्र संबंधित अधिकारी या अवैध विक्रीकडे जाणून बुजून थोडीफार चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष करीत आहेत असे नागरिकांतून बोलले जात आहे. किनगाव हे परभणी, बीड, नांदेड आदि जिल्ह्यावरच्या बॉर्डर वरचे गाव असून या गावातील लोकसंख्या जवळपास ३० ते ३५ हजारअसून, येथे दर बुधवारी आठवडी मोठा बाजार भरतो.

या आठवडी बाजारात अवैद्य मार्गाने गुटख्याची लाखो रुपयाची विक्री होत असते. शिवाय किनगाव व परिसरात किराणा दुकान पान टपरी आदी ठिकाणी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपयांचा एका दुकानात अवैध गुटखा मिळतो असे नागरिकांतून चर्चिले जात आहे. हा अवैद्य गुटखा शरीरास हानिकारक असून यामुळे कॅन्सर वगैरे असे विविध आजार होत असल्यामुळे शासनाने यावर बंदी घातली असताना देखील चोरटया मार्गाने गुटक्याची सर्रास विक्री होत आहे. या अवैद्य गुटका विक्री कडे संबंधित अधिका-यांनी लक्ष घालून चिरीमिरी न घेता हा गुटका बंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने