रामेश्वर येथील श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

 रामेश्वर येथील श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

विज्ञान शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा 91.50 टक्के निकाल

 

लातूर, दि. 30 – माध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत रामेश्वर (ता. लातूर) येथील श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा 91.50 टक्के निकाल लागला असून विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील विज्ञान शाखेच्या एकूण 117 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली होती. त्यापैकी सर्व 117 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेत चि. राजवीर राजेश कराड (87.83 टक्के) - प्रथम, कु. सृष्टी संजय केंद्रे (81.67 टक्के) - व्दितीय व चि. हर्षवर्धन चंद्रकांत चाटे याने (79.33 टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतून विशेष प्राविण्याने 18 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 95 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच कला शाखेतील एकूण 106 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेत कु. श्रध्दा ज्ञानोबा माने (84.17 टक्के) - प्रथम, कु. गायत्री पंडित कराड (83.67 टक्के) - व्दितीय व चि. अविनाश सायस पटनुरे याने (81.17 टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला असून विशेष प्राविण्याने 19 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 58 विद्यार्थी, व्दितीय श्रेणीत 21 विद्यार्थी व तृतीय श्रेणीत 1 विद्यार्थी या प्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक – विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, विद्यालय स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष तुळशीरामअण्णा कराड, विद्यालयाचे सचिव तथा कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, समन्वयक बालासाहेब कराड, विद्यालय प्रमुख सौ. आशाताई कराड, प्राचार्य व्ही. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एस. पी. लाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने