औसा येथील ६८ हमाल बांधवांसाठी विमा कवच
औसा प्रतिनिधी
निवडणूक वाचनाम्यात दिलेला शब्द अवघ्या महिनाभरात पुर्ण करित पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा बाजार समितीच्या हमाल बांधवांना मोफत विमा कवच उपलब्ध करून देत दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. (दि.१७) रोजी औसा बाजर समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात क्रिएटीव्ह फाऊंडेशन पुढाकाराने औसा बाजार समितीत कार्यरत हमाल बांधवांना २ लाख रूपयांच्या मुदत विमा, २ लाख रुपयांचा अपघात विमा कवच मोफत उपलब्ध करून देण्यात आला असून प्रतिनिधिक स्वरूपात ५ हमाल बांधवांना विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मंचावर भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील उटगे, शहराध्यक्ष लहू कांबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, प्रा सुधीर पोतदार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल झंवर हे उपस्थित होते. यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत ६८ हमाल बांधवांना २ लाख रूपयांचा मुदत विमा, २ लाख रुपयांचा अपघात विमा असा एकूण ४ लाख रुपयांचा मोफत विमा कवच उपलब्ध करून देण्यात आला. सदरील विमा योजनेचा दरवर्षीचा प्रिमियम क्रिएटीव्ह फाऊंडेशनच्या वतीने भरण्यात येणार असल्याने हमाल बांधवांना अजीवन विमा कवच मिळणार आहे. त्याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसरात विविध विकास कामातून शेतक-याना चांगल्या सुविधा उपलब्ध करून बाजार समितीला वैभव मिळवून देऊ आम्ही दिलेला शब्द पाळून वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते असून येणा-या काळात औशाची बाजार समिती जिल्ह्याात सर्वोत्तम करण्याचा संकल्प असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगून. औशाच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भिमाशंकर राचट्टे, प्रवीण कोपरकर, संदिपान लंगर, चंद्रशेखर सोनवणे, युवराज बिराजदार, प्रकाश काकडे, अजित धुमाळ, संतोषी अशोक वीर, राधाकृष्ण जाधव, रमाकांत वळके, गोंिवद भोसले, ईश्वर कुलकर्णी, मोहन कावळे, विकास नरहरे, सुरेश औटी, धनराज जाधव, शंकर पुंड, पुरुषोत्तम झिरमिरे भाजपचे तालुका सरचिटणीस संजय कुलकर्णी, तुराब देशमुख,सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी, प्रा शिवरूद्र मुरगे, बंकट पाटील, शरणाप्पा औटी,,भिमाशंकर मिटकरी, चंद्रकांत ढवण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी, मापाडी, शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीचे सचिव संतोष हूच्चे यांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
निवडणूक वचननाम्यात आम्ही मतदारांना १० वचन दिली होती, त्यातील सर्वात पहिले हमाल बांधवांशी संबंधित असलेले वचन पुर्ण करून दिलेला शब्द पूर्ण केले आहे. औसा बाजार समितीच्या शेवटच्या पण महत्वाच्या घटकाचा सर्वात आधी विचार करून त्यांना केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून मुदत व अपघात विमा कवच उपलब्ध करून दिल्याबद्दल नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या व हमाल बांधवांच्या वतीने हमाल बांधवांचे प्रतिनिधी संचालक शंकर पुंड यांनी आमदार पवार यांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा