औसा शहरात लॉजेस तरुण-तरुणींचे मजा मारण्याचे ठिकाण
औसा : प्रतिनिधी
मागच्या काही महिन्यांपासून औसा शहरातील बहुसंख्य लॉजेस तरुण-तरुणींचे मजा मारण्याचे ठिकाण बनल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या लॉजेसवर येणारी ही ग्राहक मंडळी औसा शहरातील नसून शेजारच्या शहरासह कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील आहेत. या आंबटशौकिनासाठी लॉज व्यवस्थापक सर्व व्यवस्था करीत असतात .एक प्रकारे लॉजच्या नावाखाली कुंटणखाने चालविले जात आहेत. या ठिकाणी चेहरा बांधलेल्या युवती व महिलांचा सर्रास वावर वाढला आहे .
औसा तालुका हा किल्लारीच्या प्रलयंकारी भूकंपामुळे ओळखला जायचा. त्याच औशाची ओळख आता अवैध धंद्याचे शहर म्हणून होत आहे. लॉजेसवर कुंटणखाना चालणारे शहर अशी ओळख झालेली दुर्दैवाने पाहायला मिळत आहे. तालुक्याचे ठिकाण असणा-या या शहरात दहा ते बारा लॉजेस सुरू आहेत. यापैकी बहुसंख्य लॉजेसवर दररोज सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान ग्राहकांची चांगलीच गर्दी असते. लातूरसह अन्य ठिकाणांहून येणारी कॉलेज तरुण- तरुणी. आपल्या दुचाकीवर मैत्रिणीला घेऊन येणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहावयाला मिळते. या मुलांसोबत येणा-या मुली कॉलेजला – क्लासेसला जात असल्याचे सांगून मित्रांसोबत येतात कारण त्यावेळी त्यांच्या पाठीवर कॉलेजला जाण्यासाठीची अडकवलेली बॅग दिसून येते. याचाच अर्थ आपल्या पालकांच्या डोळ्यात धूळफेक करून ही तरुण मुले केवळ शारीरिक आकर्षणापोटी या चुकीच्या दिशेला वळताना दिसत आहेत.
या मुलांना जर संबंधित लॉज चालकांनी जागाच उपलब्ध नाही करून दिली तर या अनाचाराला आळा घालणे शक्य आहे परंतु आपल्या आर्थिक फायद्यासाठी लॉज चालकही तसे न करता आपले उखळ पांढरे करून घेताना दिसत आहेत. औसा शहरात वाढलेल्या या लॉजेसवरील गैरप्रकाराबद्दल नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच व्यापा-यांनीही निवेदन देऊन असे गैरप्रकार त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. एवढे सगळे होऊनही लॉजेसवरील अवैध धंदे सुरूच आहेत. शहरात कोणताही मोठा उद्योग नाही की फार मोठी कारखानदारी नाही परंतू शहरात वाढत जाणारी लॉजची संख्या ही शहरातील सामाजिक आरोग्याला घातक आहे . याकतपूर रस्त्यावर एका पर्यटनस्थळी निर्मनुष्य जागी अवैध मार्गाने लॉज सुरू करुन अलिखित कुंटणखाना सुरु केला आहे.
अवैध लॉजला कोणाचा ‘राजा’ श्रय
शहरातील जवळपास सर्वच लॉजवर अवैध प्रकार सर्रास घडत असताना प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. एक- दोन लॉजवर सातत्याने तपासणी केली जाते अन्य लॉजवर फारशी कारवाई होत नाही. येथे येणारी जोडपी ही अनैतिक कृत्यासाठीच आलेली आहे याची खात्री असतानाही प्रशासन कारवाई करीत नाही..तुळजापूर रोडवर ग्रामीण भागात एका कला केंद्राजवळ एक लॉज असून येथे तर सर्रास ललनांचा बाजार चालू असतो पण कधीच कारवाई होत नाही . लॉजच्या आडून जाणा-या कुंटणखान्यावर प्रशासन कारवाई न करता खतपाणी घालत आहे.
टिप्पणी पोस्ट करा