निटूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीसाठी 1 कोटी 38 लाखाचा निधी मंजूर

 निटूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीसाठी 1 कोटी 38 लाखाचा निधी मंजूर

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा
निलंगा/प्रतिनिधीः- सर्वसामान्य नागरीकांना आरोग्याच्या सेवा व सुविधा अधिक जलद व सक्षमपणे मिळावे याकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने आग्रही असतात. त्या अनुषंगानेच निलंगा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. या आरोग्य केंद्राच्या इमारती सर्व सोयीसुविधायुक्त असाव्यात याकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर आग्रही आहेत. त्या अनुषंगानेच मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती अद्यावत असण्यासाठी आ. निलंगेकर पाठपुरावा करीत आहे. निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीसाठी 2 कोटी 76 लाखाची मागणी करण्यात आलेली आहे. या पाठपुराव्यामुळे निलंगा तालुक्यातील  निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीसाठी 1 कोटी 38 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत याच्यासह माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे निटूर परिसरातील नागरीक आभार व्यक्त करीत आहेत.
देशातील प्रत्येक नागरीकांना दर्जेदार आणि जलदगतीने आरोग्य सेवा सुविधा प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विविध उपक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नागरीकांना सुद्धा त्याच पद्धतीच्या आरोग्य सेवा सुविधा प्राप्त व्हावेत त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत. या  माध्यमातून निलंगा मतदारसंघातील नागरीकांना  आरोग्याच्या सेवा सुविधा जलदगतीने प्राप्त होण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. या आरोग्य केंद्रामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात सोय होत आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारती सर्व सोयी सुविधायुक्त  असाव्यात यासाठी माजी मंत्री आ. निलंगेकर प्रयत्न करीत आहेत. त्याकरिता  केंद्र व राज्यस्तरावर त्यांचा सातत्याने पाठपुरावा आहे.
या पाठपुराव्यानुसार निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीसाठी 2 कोटी 76 लाखापैकी 1 कोटी 38 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. लवकरच या आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीच्या उभारीणचे काम सुरु होईल असे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सांगितले आहे. सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल निटूर परिसरातील नागरीकांच्या वतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने