मानखेड येथे कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार

 मानखेड येथे कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार

किनगाव : वार्ताहर
मानखेड सोनखेड पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने मानखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत स्तरावर दि. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊ सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सरपंच प्रफुलाताई नारागुडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन नागेश भिकाने ग्रामविकास अधिकारी उत्तम भराडे हे उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील महिलांना महिला व बालविकास विभाग यांच्यावतीने पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सुशिला सुभाष भिकाने प्रेमकला दगडोबा मुसळे, विद्या अनिल केंद्रे, यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने