पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जनतेच्या प्रेमाने आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीत विजय संपादन करू-काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे

 पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जनतेच्या प्रेमाने आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीत विजय संपादन करू-काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे


लातूर - येथील विष्णुदास मंगल कार्यालय येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेस
पक्षाच्या विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनने श्रीशैल उटगे व ॲड. किरण जाधव
यांच्या अध्यक्ष पदाला तीन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सत्कार समारोह
आयोजित केला.

माजी मंत्री सहकारमहर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब ,महाराष्ट्राचे
माजी मंत्री अमितजी देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धिरज
देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात गेल्या तीन वर्षांपूर्वी लातूर जिल्हा
काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीशैल उटगे दादा व लातूर शहर जिल्हा
काँग्रेसच्या अध्यक्ष पदी किरण जाधव यांची निवड झाली आज या निवडीस तीन
वर्षे यशस्वी पूर्ण झाली.

या तीन वर्षांच्या काळात त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच वेळोवेळी
पक्षाने ठरवुन दिलेले कार्यक्रम देखील योग्यरीत्या पार पाडले तसेच यासोबत
त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले.  त्यांनी कोरोना काळातील महामारी मध्ये
अन्नदान वाटप,रक्तदान शिबिर,गरजूंना अन्नधान्याचे किट जिल्हाधिकारी
कार्यालयात देऊन योग्य गरजूंपर्यंत ते पोचवण्यासाठी सुपूर्त केले. करुणा
काळामध्ये अनेक शस्त्रक्रिया रखडल्या होत्या ते पाहता तत्कालीन
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील
हजारो रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिबिराच्या माध्यमातून
नेत्र शस्त्रक्रिया केल्या . जिल्हाभरात शहरात रक्तदान शिबिराच्या
माध्यमातून हजारो बाटल्या रक्तदान करण्यात आले.

       या तीन वर्षांच्या काळात त्यांनी केंद्रसरकार यांनी शेतकऱ्यांसाठी
घातक असलेले  कृषी कायदे ,कामगार विरोधी कायदे  परत घ्यावेत यासाठी
आंदोलने उभारली. शेतकरी कायद्यांच्या विरोधात लातूरमध्ये काँग्रेस
पक्षाने काढलेली  ट्रॅक्टर रॅली ऐतिहासिक ठरली आणि पक्षाने त्याची दखल
राष्ट्रीय पातळीवर घेतली.तसेच ज्या ज्या वेळेस जनतेवर अन्याय झाला त्या
वेळी आक्रमक होऊन आंदोलने केली.

जिल्ह्यात 120 किलोमीटर तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली तर शहरभर
प्रभागा प्रभागांमध्ये तिरंगा गौरव यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस
पक्षाचा इतिहास आणि पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत नेण्याचा अतिशय
स्तुत्य उपक्रम यांच्या काळात झाला.

भारत जोडो यात्रेची जबाबदारी यशसवीपणे पार पाडली, पक्षाच्या सदस्य नोंदणी
अभियानात लातूर जिल्ह्या व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने उत्कृष्ट
प्रदर्शन महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्याचा विक्रम केला.

        त्यांचे या तीन वर्षातील  सर्वांना सोबत घेऊन सामाजिक
,राजकीय,धार्मिक काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षात
कार्यतत्परता,ऊर्जा,एकजूट निर्माण झाली व नवचैतन्य निर्माण झाले त्यांनी
यशस्वी रित्या त्यांची जबाबदारी पार पाडून पक्षाचा कार्यालेख वाढवला
त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यानुषंगाने तिसऱ्या
वर्षपूर्तीचे औचित्य साधून लातूर युवक काँग्रेस,सोशल मीडिया
काँग्रेस,अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग ,अनुसूचित जाती काँग्रेस
विभाग,रोजगार व स्वयंरोजगार विभाग, ओबीसी विभाग, सहकार विभाग,डॉक्टर
विभाग,महिला काँग्रेस, सेवा दल, एन एस यु आय, असंघटित कामगार
विभाग,प्रभाग अध्यक्ष,पक्षाचे माजी नगरसेवक,पदाधिकारी यांनी त्यांचा
सत्कार सोहळा आयोजित केला होता.



यावेळी श्रीशैल उटगे यांनी आपल्या मनोगतात नेत्यांचे व अयोजकांचे आभार
मानत आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला कार्य करण्याचे बळ मिळते आणि
आपल्या शिवाय हे कार्य होऊ शकले नसते ही भावना व्यक्त केली. येणारा काळ
हा निवडणुकीचा काळ असून प्रत्येक निवडणुकीला आपण ताकतीने सामोरी जात
प्रत्येक निवडणुकीत विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड.किरण
जाधव यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नेत्यांनी माझ्यावर
विश्वास दाखवत जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे
पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि केवळ आपल्या सहकार्याने हे सर्व घडत
आहे अशी भावना व्यक्त केली. त्यांनी सत्काराबद्दल  आयोजकांचे आभार मानले.

यावेळी जेष्ठ नेते विलास सहकारी बँकेचे उपाध्यक्ष,ॲड.समदजी पटेल,माजी
महापौर ॲड.दिपक सुळ,ॲड.बाबासाहेब गायकवाड,ॲड.फारुख शेख,सुभाष घोडके,
विजयकुमार साबदे,विजयकुमार साबदे,कैलास कांबळे,इम्रान सय्यद,प्रवीण
सूर्यवंशी,ॲड.देविदास बोरूळे पाटील,प्रा.प्रवीण कांबळे,डॉ. आनंद
पवार,सिकंदर पटेल,स्वातीताई जाधव,आसिफ बागवान,मुकेश राजमाने,जालिंदर
बर्डे,इसरार सगरे ,गणेश देशमुख,व्यंकटेश पुरी,युनूस मोमीन,सचिन
मस्के,पुनीत पाटील,दत्ता सोमवंशी,आयुब मणियार, तबरेज तांबोळी,गौस
गोलंदाज,संजय ओहळ,दगडुअप्पा मिटकरी,विकास कांबळे,यशपाल कांबळे,गिरीश
ब्याळे,ॲड.सुनीत खंडागळे,महेश कोळे,धनंजय शेळके,सुंदर पाटील कव्हेकर,महेश
काळे ,नेताजी बादाडे,ॲड.अंगदराव गायकवाड,अविनाश बट्टेवार, अभिजीत
इगे,अभिषेक पतंगे,अकबर माडजे,बालाजी झिपरे,विष्णुदास धायगुडे,महेश
शिंदे,अमोल गायकवाड,धनराज गायकवाड,सचिन कोटवाड, पवनकुमार गायकवाड,फारुख
शेख,युनूस शेख,जय ढगे,अनिता रसाळ,सुलेखाताई कारेपरकर,पवन बनसोडे,प्रमोद
जोशी,जाफर शेख ,इनायत सय्यद,अमन सय्यद,बाबुराव गायकवाड,संजय सुरवसे,विजय
टाकेकर,संजय सूर्यवंशी,राजू गवळी,करीम तांबोळी,सुमित भडिकर,आशुतोष मुळे,
पवन सोलंकर,आबु मणियार,नारायण साठे,पिराजी साठे,जयदेव मोहिते,मैनुभाई
शेख,रोहित वडरुले,किरण बनसोडे,बब्रुवान गायकवाड,अशोक सूर्यवंशी,इब्राहिम
शेख आदी मान्यवर यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, पदाधिकारी
व कार्यकर्ते उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान
सय्यद,सूत्रसंचालन यशपाल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण
कांबळे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने