काही निष्क्रिय पदाधिकारी बीआरएसमध्ये गेल्याने आप ला फरक पडणार नाही

काही निष्क्रिय पदाधिकारी बीआरएसमध्ये गेल्याने आप ला फरक पडणार नाही
लातूर- लातूर आम आदमी पार्टीचे कांही निष्क्रीय पदाधिकारी पक्षावर विनाकारण टिका करत बीआरएसमध्ये दाखल झालेे,त्यांच्या जाण्याने आपला काही ङ्गरक पडणार नाही, उलट पदे भोगून निष्क्रीय राहणारे लोक गेल्याने चांगले काम करणार्‍या,निष्ठावान कार्यकर्त्यांना लाभच होणार आहे, अशी प्रतिक्रिया आपचे माजी जिल्हा सचिव इंजि.अश्‍विन नलबले यांनी केली आहे.
एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,प्रताप भोसले यांना आम आदमी पार्टीने लातूर जिल्ह्यामध्ये पार्टी वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती पण त्यांनी आम आदमी पार्टी पक्ष वाढविण्यासाठी काहीच कामे केली नाहीत. त्यांनी प्रत्येक वेळेस आम आदमी पार्टी मधील कार्यकर्त्यांची खच्चीकरण करुन  प्रस्थापित पक्षाला वाढवण्यासाठी मदत केली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे ,असे प्रकार केले आहेत. यामुळे ते पक्ष सोडून गेल्यामुळे आम आदमी पार्टीला काही फरक पडणार नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचे प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संवाद यात्रा चालू आहे.लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वराज्य संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आम आदमी पार्टी बरोबर जुडत आहेत,येणारा काळ हा आम आदमी पार्टीचा असणार आहे. लातूर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे असेही इंजि.अश्विन नलवले,आपचे नेते दीपक कानेकर ,सुमित दीक्षित,युवा जिल्हा अध्यक्ष आकाश मोठेराव,युवा प्रवक्ते विक्रांत शंके,फिरोज शेख, साहिल तांबोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने