मृग गेला कोरडाच; आता आर्द्रावर आशा

 मृग गेला कोरडाच; आता आर्द्रावर आशा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गतवर्षी जुनमध्ये आतापर्यंत ७०.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. यंदा मात्र पेरणीसाठी शेतक-यांची श्रद्धा असलेले मृग नक्षत्र अखेर कोरडेच गेले. गुरुवारपासून आद्रा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. आता आद्रा नक्षाततरी पाऊस पडेल का?, असे प्रश्न चिन्ह शेतक-यांसह सर्वांच्याच चेह-यावर दिसून येत आहे. मृृग कोरडा गेल्यानंतर आता आद्रा नक्षावर सर्वांची आशा आहे.

लातूर जिल्ह्यात मे-एप्रिलमध्ये बेमोसमी पावसाचा वादळी जोर होतो. जिल्ह्यात कधी कुठे तर कधी कुठे बेमोसमी पाऊस वीजांच्या कडकडाटांसह पडला. या पावसात विजा पडुन अनेक पशुधनाला जीव गमवावा लागला. आंबा, द्राक्ष आदी फळबांगांचे नुकसान झाले. यंदा पाऊस चांगला असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे शेतक-यांनी मे महिन्याच्या उन्हाचा तडाखा सहन करीत खरीपासाठी रान तयार केली. पेरणीपुर्व मशागती वेळेत उरकुन घेतल्या. बी, बियाणे, खते यांची जमवाजमव केली. पेरणी योग्य पाऊस पडताच पेरण्या उरकण्याची सर्व तयारी शेतक-यांनी करुन ठेवलेली आहेत. मात्र मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने पेरण्या रखडल्या आहेत.लातूर जिल्हा पर्जन्य छायेखाली प्रदेश म्हणून ओळखला जातो. असमतोल पाऊस हे लातूर जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य मानले जाते. परंतु गत वर्षी संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील दोन मोठे, आठ मध्ये व १३२ असे एकुण १४२ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले होते. लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणही पुर्ण क्षमतेने भरले होते. या धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. आजही बहूतेक प्रकल्पांत ब-यापैकी पाणीपातळी ब-यापैकी आहे. यंदा मान्सुन सुरु झाला परंतू, मान्सून बरसलाच नाही. गतवर्षी जिल्ह्यात जुनमध्ये आतापर्यंत ७०.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. परंतू, यंदा अद्याप पाऊसच पडला नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने