श्री. महादेव विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार,प्रा.सुभाष गिरी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

 श्री. महादेव विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार,प्रा.सुभाष गिरी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

लातूर- धनेगाव,ता.देवणी येथील श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार आणि प्रा.सुभाष  गिरी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा बुधवार,दि.२८ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व यशवंत वरिष्ठ महाविद्यालय,धनेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ.एस.एस.एम.प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले हे लाभणार असून, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.एस.एम.प्रतिष्ठानच्या सचिव तथा सिध्देश्‍वर सहकारी बँकेच्या संचालक प्रा.डॉ.सुनीता चवळे,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनिल मुळे, रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदास कुटवाड हे राहणार आहेत, तर यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले, ऍड.ब्रम्हानंद धानूरे,वलांडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, देवणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतीष बिरादार, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, संस्थाचालक शिवा अष्टूरे , दिशा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सोनू डगवाले, स्पंदन हॉस्पिटल उदगीरचे डॉ.नवनाथ सोनाळे,उद्योजक डॉ.संतोष डोंगरे, साहित्यिक डॉ.गणेश मुंडे याची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी सदरील संयुक्त कार्यक्रमाला जास्तीत जास्त शिक्षक,पालक,विद्यार्थी व शिक्षणपे्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त  स्वागताध्यक्ष प्राचार्य रामलिंग मुळे, पर्यवेक्षक,प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी तसेच प्रा.सुभाष गिरी माजी विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब उमाटे, सचिव संतोष गंपले, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.सोमनाथ कदम, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.राजकुमार जाधव आदिंनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने