औसा तालुक्याचा नावलौकिक शुभाली परिहारने देशात केला: संतोष सोमवंशी

औसा तालुक्याचा नावलौकिक शुभाली परिहारने देशात केला: संतोष सोमवंशी
औसा/ प्रतिनिधी- तालुक्यातील चलबुर्गा गावची भूमिकन्या अशी शूभाली लक्ष्मीकांत परिहार या विद्यार्थिनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 473 वी रँक मिळवून उज्वल यश संपादन करीत औसा तालुक्याचा लौकिक देशभरात वाढविला असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती शिवसेना नेते संतोष सोमवंशी यांनी केले. 
चलबुर्गा येथे शुभाली परीहार व जावाई चंद्रशेखर परदेशी च्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना संतोष सोमवंशी म्हणाले की , गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांनी नावलौकिक करीत असून औसा तालुक्यात शुभाली परिहारच्या रूपाने तालुक्याच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे 
स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक तसेच, वडील प्राध्यापक लक्ष्मीकांत परिहार आणि पती चंद्रशेखर परदेशी यांची खंबीर साथ यामुळेच आपणास हे यश संपादन करता आले अशी प्रतिक्रिया शुभाली परीहार यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली चलबुर्गा ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, प्रा. दत्तात्रय सुरवसे, दत्ता परिहार, प्राचार्य मारुती सुर्यवंशी दयानंद चव्हाण, लक्ष्मीकांत परिहार, शूभालीचे पती चंद्रशेखरसिंह परदेशी, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, योगानंद स्वामी, उपसरपंच सौ विजयमाला मोरे ,ॲड. बाबुराव मोरे, दावतपूर सरपंच विठ्ठल बेडजवळगे, राहुल मोरे, धर्मेंद्र बिसेन सर, प्रा. अंकुश सुर्यवंशी सोसायटीचे चेअरमन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने